कुसुमाग्रज स्मारक

कुसुमाग्रजांचे स्मारक उभारले जाऊन त्याद्वारे प्रतिष्ठानच्या कार्याची व्याप्ती वाढावी यासाठी महाराष्ट्र शासन आणि नाशिक महानगर पालिका ह्यांनी ९००० चौ.मी. जागा उपलब्ध करून दिली असून तेथे अंदाजे ३.५० कोटी रू. चे भव्य स्मारक उभारले गेले आहे. त्यातील २५०० चौ.मी. चे बांधकाम झाले असून ६००० चौ.मी. जागेत उद्यान होत आहे.
kusumagraj

हिरव्यागार जमिनीने अच्छादित असलेले दालने आणि त्यातून विविध वृक्षराजी आणि डाकबंगल्याच्या कौलारू प्रवेशद्वारातून उभे राहणारे स्मारक रसिक वाचक आणि पर्यटकांचा प्रशंसेचा विषय झाले आहे. दोन्ही बाजूस असलेली दालने आणि दोघांना जोडणार्‍या कमानी लक्ष वेधून घेतात.

आपण ह्या कार्यात आमचे सहकारी व मित्र व्हावे, ही नम्र विनंती


Copyright 2010, Kusumagraj Pratishthan, Nashik. All Rights Reserved.
Site Designed & Maintained By Cyberedge Web Solutions Pvt. Ltd.