अद्यावत संपन्न असे वाचनालय, कथा, कादंबर्या, नाटक, कविता, अध्यात्म, विज्ञान, प्रवास वर्णन, चरित्र इ. विषयांवरील १६,००० पेक्षा जास्त पुस्तके, २५२४ सभासद, स्वतंत्र बाल विभाग, विज्ञान विभाग, मुक्तद्वार-वृत्तपत्रे, मासिके वाचण्यासाठी मुक्तद्वार.
ग्रंथ तुमच्या दारी
जेथे जवळपास वाचनालय नाही किंवा पुस्तके सहजपणे वाचायला मिळत नाही अशा ठिकाणी एखादी व्यक्ती, अथवा संस्था यांनी प्रदर्शित केल्यास तेथे १०० वाचनीय पुस्तके असलेली पेटी विनामूल्य देणे. संबंधित व्यक्ती/संस्थेने त्या विभागातील वाचकांना ती पुस्तके वाचावयास देणे. देव-घेव करणे व ती पुस्तके वाचून झाल्यावर प्रतिष्ठानकडून नवीन पेटी बदलून घेणे. आत्तापर्यंत ५२१ पेटया झाल्या आहेत.
विविध कलावर्ग
कुसुमाग्रज स्मारकात सुगम व शास्त्रीय गायन, हार्मोनियम, कॅसीओ, तबला वादन, कथ्थक नृत्य, नाटक, चित्रकला, योगासने शिकविण्याचे वर्ग चालवले जातात.
अभ्यासिका
इयत्ता १०वी चे पुढील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची व्यवस्था.
गायन, वादन, नृत्य विषय दृक श्राव्य रेकॉर्डीगचे संकलन करून ते ऐकवणे प्रदर्शित करणे.
आर्ट गॅलरी
चित्र, शिल्प, छायाचित्र, इ. चे प्रदर्शने व कार्यशाळा आयोजित करणे.
कुसुमाग्रज जीवन दर्शन
कुसुमाग्रजांच्या जीवनातील महत्वाच्या क्षणांची छायाचित्रे, कुसुमाग्रजांची साहित्य संपदा, कुसुमाग्रजांच्या कविता व त्यास अनुरूप अशी चित्र ह्या माध्यमातून कुसुमाग्रज जीवन दर्शन घडविणार्या स्वतंत्र कक्षाची उभारणी.