१. कुसुमाग्रज जीवन दर्शन (जीवन लहरी) - या दालनात कुसुमाग्रजांची दालने - साहित्य संपदा, त्यांचा जीवनपट, नामवंत कलाकार, साहित्यिक, समाजसेवक इत्यादींसह
काढली गेलेली त्यांची छायाचित्रे यांचे मोठया पडद्यावर दर्शन घडत राहाते. तसेच नामवंत कलाकारांच्या आवाजात कुसुमाग्रजांच्या कविता, नाटयपदे,
नाटकातील प्रवेश ऐकता येण्याची सोय केली गेली आहे. याखेरीज, कुसुमाग्रजांच्या हस्ताक्षरातील मूळ पत्रे, सूचना, साहित्य त्यांना प्राप्त झालेले पुरस्कार,
मानपत्रे इत्यादींचा संग्रह देखील पाहता येतो.
२. कुसुमाग्रज साहित्य केंद्र
३. वाचनालय (अक्षरबाग) - कुसुमाग्रज स्मारक वाचनालय सुमारे १६,००० (सोळा हजार) पुस्तके आणि सभासद संख्या २५२४. देवघेव विभाग आणि वृत्तपत्र, मासिके विभाग.
४. मुक्तव्दार वाचनालय व संदर्भ ग्रंथालय
५. अभ्यासिका (प्रवासी पक्षी) - अभ्यासिका, सुमारे १२५ विद्यार्थी-विद्यार्थिंनीसाठी.
६. सभागृह (श्रावण) - ५० प्रेक्षकांसाठी छोटे सभागृह.
७. कलादालन (छंदोमयी) - कलादालन, चित्र-शिल्प, प्रदर्शने यासाठीं सभागृह.
८. उपहारगृह
९. जलाशय
१०. खुले नाटयगृह
११. निवास व्यवस्था
१२. नाटय दालन (स्वगत) - १०० ते १५० प्रेक्षकांसाठी छोटे सभागृह, नाटकांच्या चर्चा, छोटया संगीत मैफली ह्यासाठी उपयुक्त.
१३. संगीत दालन (मारवा) - संगीत विभाग
१४. चर्चागृह (मुक्तायन) - छोटेखानी बैठका, चर्चा ह्यासाठी सभागृह (प्रेक्षक संख्या २० ते ४० पर्यंत)
१५. कार्यालय (पाथेय) - कार्यालय
१६. विविध कला आविष्कार सभागृह (विशाखा) - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका आहे. यात एकाच वेळी ५० विद्यार्थी अभ्यास करू शकतात.
विशाखा दालन - व्याख्याने, काव्यवाचन, अभिवाचन, मुलाखत, संगिताच्या मैफिली इत्यादींसाठी प्रोजेक्टर, ध्वनीचित्र मुद्रण यांसह ३०० प्रेक्षकांसाठी, बहुपयोगी वातानुकूलीत असे हे सभागृह आहे.
वरील दालने सुसज्ज, विकसित झाली असून अद्याप परिसंवाद, चर्चासत्रे, कला-कार्यशाळा, नाट्य व संगीतासाठी ३० ते १५० व्यक्ती मावतील अशी आणखी ४ दालने व कलादालन (आर्ट गॅलरी) उभारून तयार आहेत व त्यांचे सुसज्जीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. (तथापि, आजमितीस त्या दालनामध्ये तुटपुंज्या साधनांसह संगीत, नृत्त्य या कलांचे वर्ग, कार्यशाळा, परिसंवाद काव्यवाचन इत्यादींचे आयोजन होतच आहे. तसेच हिरवळीवर मुक्त सामाजीक बैठका आयोजिल्या जातात.) या खेरीज खुले नाट्यमंच व प्रेक्षागृह, अतिथी गृह व प्रतिष्ठानाचे अद्यावत कार्यालय इत्यादी कामे सुरू करावयाची आहेत.
प्रेक्षकांच्या अपेक्षेनुसार ५० ते ३०० पर्यंत प्रेक्षक बघण्याची क्षमता असलेले विविध दालने, आज नाशिक महानगरीच्या मध्यवस्तीत सांस्कृतिक केंद्रे बनली आहे. ह्या दालनांमध्ये वर्षभर विविध विषयांमधील नामवंतांची व्याख्याने, मुलाखती, चर्चासत्रे, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
|