|
|
|
''साहित्यभूषण'' परीक्षा - मे २०१५ |
कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक आयोजित ''साहित्यभूषण'' परीक्षा - मे २०१५
परीक्षेचा अभ्यासक्रम, सूचना, नियम व परीक्षेचा अर्ज इत्यादी |
|
|
|
''साहित्यभूषण'' परीक्षा उद्देश |
मे १९९६ पासून कुसूमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक तर्फे 'साहित्यभूषण' ही मराठी परीक्षा साहित्याचा उच्च स्तरावर अभ्यास व्हावा ह्या दृष्टीने सुरू करण्यात आलेली परीक्षा आहे.
वाचनाला व्यापकता पण त्याचबरोबर एक प्रकारची सखोलता असावी. कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, विनोदपर पुस्तके इ. वाचतांना त्यांचे आकलन साहित्याच्या द्ष्टीने शास्त्रशुध्द कसे करता येईल, आपली वाचनसंस्कृती समृध्द कशी होईल ह्या दृष्टीने 'साहित्यभूषण' परीक्षा हा एक सहजसुंदर प्रयोग आहे.
हल्ली आपल्याच मराठी भाषेच्या शुध्द लेखनावर, शुध्द उच्चारांवर प्रसार माध्यमे, दुकानांच्या पाटया, पुष्कळदा वृत्तपत्रातील मोठमोठया जाहिराती इ. मधून अनेक प्रकारे प्रहार होत असतात. बालपणातच विद्यार्थी चुकीचे मराठी ग्रहण करतात. तसे होऊ नये म्हणून 'व्यावहारिक मराठी' ही देखील प्रश्नपत्रिका अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे.
निरीक्षण,संभा षण, वाचन, ग्रहण, अध्ययन, आकलन, उपयोजन ह्या भाषिक कौशल्याच्या पायर्या आहेत. ह्या, दृष्टीने आपण 'साहित्यभूषण' परीक्षेचा सर्वकष अभ्यास करून यशस्वी व्हावे, ही अपेक्षा. |
|
अभ्यासपत्रिका - १ |
साहित्यप्रकाराचा अभ्यास- कथा |
गुण-१०० |
शिल्प |
मोनिका गजेंद्र गडकर |
मौज प्रकाशन |
इडा पिडा टळो |
आसाराम लोमटे |
शब्द प्रकाशन |
ओल हरवलेली माती |
नीरजा |
पॉप्युलर प्रकाशन |
शुभवर्तमान |
भारत सासणे |
मॅजेस्टीक प्रकाशन |
|
अभ्यासपत्रिका - २ |
साहित्यप्रकाराचा अभ्यास-कादंबरी |
गुण-१०० |
निशाणी डावा अंगठा |
रमेश इंगळे उत्रादकर |
ग्रंथाली प्रकाशन |
तणकट |
राजन गवस |
शब्दालय प्रकाशन |
बारोमास |
सदानंद देशमुख |
कॉन्टिनेन्टल प्रकाशन |
साता उत्तराची कहाणी |
ग. प्र. प्रधान |
मौज प्रकाशन |
|
अभ्यासपत्रिका - ३ अ |
साहित्यप्रकाराचा अभ्यास - ललित गद्य |
गुण-५० |
कोरडी भिक्षा |
श्रीनिवास विनायक कुलकर्णी |
मौज प्रकाशन |
हिरवे अनुबंध |
द. ना. धनागरे |
मौज प्रकाशन |
झिम्मा |
विजया मेहता |
राजहंस प्रकाशन |
मेक्सिकोपर्व |
मीना प्रभू |
मौज प्रकाशन |
साथ सोबत |
सिंधूताई कानेटकर |
पॉप्युलर प्रकाशन |
अभ्यासपत्रिका - ३ ब |
साहित्यप्रकाराचा अभ्यास - नाटक |
गुण-५० |
वीज म्हणाली धरतीला |
वि. वा. शिरवाडकर |
पॉप्युलर प्रकाशन |
ती फुलराणी |
पु. ल. देशपांडे |
पॉप्युलर प्रकाशन |
काय डेंजर वारा सुटलाय |
जयंत पवार |
पॉप्युलर प्रकाशन |
वाडा चिरेबंदी |
महेश एलकुंचवार |
मौज प्रकाशन |
|
अभ्यासपत्रिका - ४ |
साहित्यप्रकाराचा अभ्यास - काव्य |
गुण-१०० |
विशाखा |
कुसुमाग्रज |
कॉन्टिनेन्टल प्रकाशन |
निवडक ३० कवितांचा संग्रह |
कुसुमाग्रज प्रतिष्ठानमार्फत दिला जाईल |
अभ्यासपत्रिका - ५ |
मराठी भाषेचे उपयोजन (व्यावहारिक)- मराठी |
गुण-१०० |
अ. |
भाषाभिवृध्दीची सामाजिक दृष्टी |
श्री. म. माटे |
भाषेतून दिसणारी स्त्री |
आशा मुंडले |
मला शब्द द्या |
वि. वा. शिरवाडकर |
राजकारणाची भाषा |
ग. प्र. प्रधान |
अंधेर नगरी निपाणी |
अनिल अवचट |
जीव घाबरा करणारी भाषा |
मॅक्सिन बर्नसन |
बायकांची भाषा |
द. पां. खांबेटे |
विविध ग्रंथांमधून निवडलेल्या वरील लेखांची पुस्तिका प्रतिष्ठानमार्फत देण्यात येईल. |
ब. |
शब्दनिष्ठ सर्जनशीलता, अनेकार्थी शब्द, एका शब्दासाठी अनेक शब्द, समानार्थी शब्द, वाक्य खंडासाठी एक शब्द, म्हणी, वाकप्रचार.
बातमी पत्र, जाहिरात लेखन, निमंत्रण पत्रिका, संगणकीय लेखन
मुद्यावरून गोष्ट तयार करणे
जुन्या गोष्टींवरून नवी गोष्ट तयार करणे
व्याख्या करा, सूत्र सांगा, निष्कर्ष काढणे, निबंध लेखन
व्यक्तिचित्र, प्रवासवर्णन. |
संदर्भ पुस्तके |
व्यावहारिक मराठी-कल्याण काळे-द दि. पुंडे - निराली प्रकाशन
मराठी भाषेचा सर्जनशील वापर कार्यपुस्तक (४) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक |
|
अभ्यासपत्रिका - ६ |
निबंध |
गुण-५० |
विविध दैनंदिन विषयांशी निगडीत १० विषय देण्यात येतील. त्यातील एका विषयावर निबंध लेखन करावयाचे आहे. |
अभ्यासपत्रिका - ६ |
प्रकल्प |
गुण-५० |
प्रतिष्ठानने दिलेल्या प्रकल्पांमधील एका आवडत्या विषयावर अभ्यास करून सविस्तर प्रकल्प सादर करावयाचा आहे. त्या बाबतच्या सूचना स्वतंत्र देण्यात येतील. प्रकल्पांचे नमुना विषय |
आपल्या गावातील लेखकाची मुलाखत.
आपल्या गावातील बोली भाषेतील वेगळे ५० शब्द अर्थांसह संकलित करा.
दूरदर्शनवरील आवडत्या मालिकेचे रसग्रहण.
आपल्या प्रदेशातील लोकगीतांचे संकलन (स्पष्टीकरणासह किमान २५)
ह्या धर्तीवर प्रकल्पांचे विषय देण्यात येतील. |
|
''साहित्यभूषण'' परीक्षा नियमावली |
ही परीक्षा विद्यापीठीय परीक्षेशी समकक्ष नाही.
ही परीक्षा नोकरी मिळवून देणारी, व्यवसायात प्रवेश, पदोन्नती देणारी नाही, त्यामुळे शासनाची मान्यता मिळवणे हा उद्देश यामागे नाही.
या परीक्षेसाठी कोणत्याही पूर्व शिक्षणाची अट नाही, मराठी भाषेचा व साहित्याचा अभ्यास करू इच्छिणार्या कोणत्याही व्यक्तीला या परीक्षेस बसता येईल.
या परीक्षेचे अध्यापन केंद्र कोठेही नाही.
स्वयं अध्ययनातून अभ्यास करावयाचा आहे. नियुक्त केलेली पुस्तके स्वत:च उपलब्ध करून घ्यावयाची आहेत. अभ्यासपत्रिका व उत्तरपत्रिका कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून दिल्या जातील. पुरवण्या नसतील. आवश्यक वाटल्यास स्वत:च्या जोडल्या तरी चालतील.
हा अभ्यासक्रम फक्त ६ अभ्यास पत्रिकांचा आहे. त्यात विविध वाङमय प्रकारांचा, व्यावहारिक मराठीचा, सहज व रस घेऊन करता येणार्या प्रकल्पांचा समावेश करण्यात आलेला आहे.
प्रत्येक अभ्यास पत्रिका १०० गुणांची असेल. अभ्यास पत्रिकांची उत्तरे दिलेल्या मुदतीत (२५ दिवसात) घरीच लिहून प्रतिष्ठानकडे पोस्टाने किंवा प्रत्यक्ष कार्यालयात येऊन द्यावयाची आहेत.
प्रत्येक अभ्यास पत्रिकेत एक प्रश्न अनिवार्य असून इतर प्रश्नांना पर्याय असतील. अभ्यास पत्रिका १ ते ३ मधे प्रत्येक साहित्यप्रकारातील किमान एका ग्रंथाचा सखोल अभ्यास अपेक्षित आहे.
परीक्षेचा अर्ज हा कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या संकेत स्थळावर (www.kusumagraj.org) उपलब्ध आहे. परीक्षेचा अर्ज बिनचूक भरून कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या पत्यावर पाठवायचा आहे. पत्ता बदलल्यास कळविण्याची जबाबदारी आपली आहे, न कळविल्यास अभ्यासपत्रिका व इतर साहित्य आपल्याला उपलब्ध न झाल्यास त्यास आपण स्वत:च जबाबदार असाल, कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाही.
बिनचूक भरलेल्या परीक्षा अर्जासोबत रू ५००/- प्रत्यक्ष रोख किंवा डी.डी. 'कुसूमाग्रज प्रतिष्ठान' या नावाने दिलेल्या पत्यावर पाठवावा. धनादेश चालणार नाही. डी. डी. राष्ट्रीयकृत बँकेचाच असावा. रोख पैसे भरल्यास त्वरीत कार्यालयाची पावती मिळेल व आवश्यक ते साहित्यही मिळेल. डी.डी. व अर्ज मिळाल्यावर सर्व साहित्य आपल्या पत्यावर पाठविले जाईल.
एकदा पाठविलेला डी.डी. कोणत्याही सबबीवर परत केला जाणार नाही किंवा पुढच्या वर्षीसाठी राखून ठेवला जाणार नाही.
परीक्षा मे २०१५ मध्ये होईल.
परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान ५० टक्के गुण आवश्यक आहे व प्रत्येक पेपरमध्ये किमान ३५ टक्के गुण आवश्यक आहेत.
या परीक्षेत फेरतपासणी किंवा पुनर्मूल्यांकन पध्दत नाही.
उत्तरपत्रिकेतील हस्ताक्षर आपले असावे. पुस्तकातील उतारे तसेच्या तसे नकोत.
पूर्वीच्या प्रश्नपत्रिका मिळणार नाही. कृपया तशी मागणीही करू नये.
परीक्षेत उत्तीर्ण होणार्या प्रत्येकास 'साहित्यभूषण' प्रमाणपत्र प्राप्त होईल.
या परीक्षेतील पुरस्कार पुढीलप्रमाणे |
|
''साहित्यभूषण'' परीक्षेतील पुरस्कार पुढीलप्रमाणे |
प्रथम - 'इंद्रायणी' पुरस्कार - सन्मानपत्र व रोख रक्कम
द्वितीय - 'गोदामाता' पुरस्कार - सन्मानपत्र व रोख रक्कम
तृतीय - 'कृष्णामाई' पुरस्कार - सन्मानपत्र व रोख रक्कम |
पुरस्कारप्राप्त व्यक्तीस कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या नियमानुसार प्रवासभत्ता देण्यात येईल. |
|
'साहित्यभूषण मे २०१५ ' परीक्षेसाठी अभ्यासकाने भरावयाचे प्रपत्र |
|
|