सहकार्य

आपल्याकडून अपेक्षा

कुसुमाग्रज स्मारकाचे अद्यावतीकरणाचे काम व नवीन उभारणी वेगाने पूर्ण होणे आवश्यक आहे. दैनंदिन व्यवस्थापन, प्रशासन आदींसाठी देखील पैशांची आवश्यकता असते. आपल्या क्षमतेनुसार जास्तीत जास्त देणगी प्रतिष्ठानला द्यावी ही विनंती. (या देणग्यांना आयकरातून सवलत मिळते.)

१. स्मारकातील नवीन दालनांसाठी व दालनांना अद्यावत करण्यासाठी अर्थसहाय्य करणे.
२. स्मारकाच्या भविष्यातील प्रकल्पांच्या उभारणीसाठी अर्थ सहाय्य.
३. ’ग्रंथ तुमच्या दारी’ नाशिक, पुणे व अन्य जिल्ह्यांमध्ये, राज्यस्तरीय विस्तार करण्यासाठी अर्थसहाय्य.
४. कार्यक्रम व उपक्रमांसाठी (प्रायोजकत्व स्वीकारून किंवा क्षमतेनुसार) अर्थसहाय्य.
मा. तात्यासाहेबांना समाजातील अज्ञान अंधकार दूर व्हायला हवा होता. समता, बंधुत्व, सहानभुती, जिव्हाळा, प्रेम हे सार्‍या समाजामध्ये असावे ही त्यांची तीव्र उत्कट इच्छा असे. प्रेमाला ते सार्‍या संस्कृतीचा सारांश मानत. त्यांच्या प्रेरणेने आणि इष्टमित्रांच्या सहकार्याने स्थापन झालेल्या ह्या प्रतिष्ठानला आपण स्वत: आणि आपल्या स्नेह्यांनी सर्वतोपरी सहकार्य केले, तर त्यांची स्वप्ने प्रत्यक्षात आणता येतील. त्यासाठी हे आपल्याला स्नेहपूर्ण आवाहन, आपण प्रतिसाद द्याल ह्या खात्रीने केलेलं !

संपर्क
कुसुमाग्रज प्रतिष्ठान
तरणतलावामागे, टिळकवाडी, नाशिक - ४२२ ००२.
दूरध्वनी :- +९१ ०२५३ २५७६१२४
(न्यास नोंदणी पत्र क्र. इ. ५६४)
कुसुमाग्रज स्मारक
गंगापूर रोड, नाशिक - ४२२ ०१३
फोन: +९१ २५३ २५७६१२५

Copyright 2010, Kusumagraj Pratishthan, Nashik. All Rights Reserved.
Site Designed & Maintained By Cyberedge Web Solutions Pvt. Ltd.