''साहित्यभूषण'' परीक्षा - मे २०२५
कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक आयोजित ''साहित्यभूषण'' परीक्षा - मे २०२५ परीक्षेचा अभ्यासक्रम, सूचना, नियम व परीक्षेचा अर्ज इत्यादी


new bullet ''साहित्यभूषण'' परीक्षा उद्देश
bullet मे १९९६ पासून कुसूमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक तर्फे 'साहित्यभूषण' ही मराठी परीक्षा साहित्याचा उच्च स्तरावर अभ्यास व्हावा ह्या दृष्टीने सुरू करण्यात आलेली परीक्षा आहे.
bullet वाचनाला व्यापकता पण त्याचबरोबर एक प्रकारची सखोलता असावी. कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, विनोदपर पुस्तके इ. वाचतांना त्यांचे आकलन साहित्याच्या द्ष्टीने शास्त्रशुध्द कसे करता येईल, आपली वाचनसंस्कृती समृध्द कशी होईल ह्या दृष्टीने 'साहित्यभूषण' परीक्षा हा एक सहजसुंदर प्रयोग आहे.
bullet हल्ली आपल्याच मराठी भाषेच्या शुध्द लेखनावर, शुध्द उच्चारांवर प्रसार माध्यमे, दुकानांच्या पाटया, पुष्कळदा वृत्तपत्रातील मोठमोठया जाहिराती इ. मधून अनेक प्रकारे प्रहार होत असतात. बालपणातच विद्यार्थी चुकीचे मराठी ग्रहण करतात. तसे होऊ नये म्हणून 'व्यावहारिक मराठी' ही देखील प्रश्नपत्रिका अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे.
bullet निरीक्षण,संभा षण, वाचन, ग्रहण, अध्ययन, आकलन, उपयोजन ह्या भाषिक कौशल्याच्या पायर्‍या आहेत. ह्या, दृष्टीने आपण 'साहित्यभूषण' परीक्षेचा सर्वकष अभ्यास करून यशस्वी व्हावे, ही अपेक्षा.

साहित्यभूषण अभ्यासक्रम मे २०२५

bullet अनिवार्य अभ्यासक्रम (खालील चार अभ्यासपत्रिका सोडवणे अनिवार्य आहे.)

अभ्यासपत्रिका - १
साहित्यप्रकाराचा अभ्यास- कथा व कांदबरी गुण-१००
अ) सत्तांतर व्यंकटेश माडगुळकर मेहता पब्लिशिंग हाऊस
ब) फकिरा अण्णाभाऊ साठे सुरेश एजन्सी
क) मारवा आशा बगे मौज प्रकाशन गृह
ड) वनवास प्रकाश नारायण संत मौज प्रकाशन

अभ्यासपत्रिका - २
साहित्यप्रकाराचा अभ्यास-कविता गुण-१००
निवडक ५० कविता (केशवसुत ते समकालीन कवी)
हा निवडक कवितांचा संग्रह कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून अभ्यासकांना दिला जाईल.

new bullet अभ्यासपत्रिका - ३
साहित्यप्रकाराचा अभ्यास- नाटक गुण-१००
अ) हिमालयाची सावली वसंत कानेटकर पॉप्युलर प्रकाशन
ब) साष्टांग नमस्कार आचार्य प्र.के. अत्रे परचुरे प्रकाशन मंदिर
क) किरवंत प्रेमानंद गज्वी मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
ड) आई रिटायर होते अशोक पाटोळे पॉप्युलर प्रकाशन

new bullet अभ्यासपत्रिका - ४
अन्य साहित्य प्रकार गुण-१००
अ) चकवाचांदण मारुती चित्तमपली (आत्मचरित्र) मौज प्रकाशन गृह
ब) अफगाण डायरी प्रतिभा रानडे (सामाजिक) राजहंस प्रकाशन
क) स्वातंत्र्यलढयाचे पाठीराखे      सयाजीराव गायकवाड बाबा भांड (चरित्र) साकेत प्रकाशन
ड) मुस्लिम मनाचा शोध शेषराव मोरे (वैचारिक) राजहंस प्रकाशन

bullet वैकल्पिक अभ्यासक्रम - (खालील चारपैकी कोणत्याही दोन अभ्यासपत्रिका सोडवाव्यात)

new bullet अभ्यासपत्रिका - ५
व्यावहारिक मराठी/भाषाभ्यास गुण-१००
अ) संपादित लेखसंग्रह - कुसुमाग्रज प्रतिष्ठानमार्फत दिला जाईल.
ब) मुलाखत
क) निबंध लेखन
ड) वैचारिक लेख
इ) रसग्रहण (नाटक, चित्रपट, मालिका)
new bullet अभ्यासपत्रिका - ६
संत साहित्याचा अभ्यास गुण-१००
अ) संत जनाबाई
ब) संत कान्होपात्रा
क) संत चोखामेळा
ड) संत गोराकुंभार
वरील संतांचे अभंग 'सकलगाथा' या ग्रंथात समाविष्ट आहेत. अभ्यासकांनी पंश्नांच्या अनुषंगाने संदर्भ ग्रंथ म्हणून प्रस्तुत गाथेचा अभ्यास करावा.

new bullet अभ्यासपत्रिका - ७
लोकसाहित्याची वाटा-वळणे गुण-१००
अ) एकनाथांची निवडक भारुडे डॉ. वसंत जोशी मेहता पब्लिशिंग हाऊस
ब) आठवणीतले अंगण डॉ. अरुणा ढेरे पद्मगंधा प्रकाशन
क) गोंधळ - परंपरा, स्वरुप आणि आविष्कार डॉ. रामचंद्र देखणे पद्मगंधा प्रकाशन
ड) यक्षगान - कला आणि अभ्यास विजयकुमार फातर्पेकर पद्मगंधा प्रकाशन

new bullet अभ्यासपत्रिका - ८
कवीचा विशेष अभ्यास - कुसुमाग्रज गुण-१००
अ) विशाखा पॉप्युलर प्रकाशन
ब) समिधा पॉप्युलर प्रकाशन
क) छंदोमयी पॉप्युलर प्रकाशन
ड) मारवा पॉप्युलर प्रकाशन

एकूण गुण - ६००


new bullet ''साहित्यभूषण'' परीक्षा नियमावली
bullet ही परीक्षा विद्यापीठीय परीक्षेशी समकक्ष नाही.
bullet ही परीक्षा नोकरी मिळवून देणारी, व्यवसायात प्रवेश, पदोन्नती देणारी नाही, त्यामुळे शासनाची मान्यता मिळवणे हा उद्देश यामागे नाही.
bullet या परीक्षेसाठी कोणत्याही पूर्व शिक्षणाची अट नाही, मराठी भाषेचा व साहित्याचा अभ्यास करू इच्छिणार्‍या कोणत्याही व्यक्तीला या परीक्षेस बसता येईल.
bullet या परीक्षेचे अध्यापन केंद्र कोठेही नाही.
bullet स्वयं अध्ययनातून अभ्यास करावयाचा आहे. नियुक्त केलेली पुस्तके स्वत:च उपलब्ध करून घ्यावयाची आहेत. अभ्यासपत्रिका व उत्तरपत्रिका कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून दिल्या जातील. पुरवण्या नसतील. आवश्यक वाटल्यास स्वत:च्या जोडल्या तरी चालतील.
bullet हा अभ्यासक्रम फक्त ६ अभ्यास पत्रिकांचा आहे. त्यात विविध वाङमय प्रकारांचा, व्यावहारिक मराठीचा, सहज व रस घेऊन करता येणार्‍या प्रकल्पांचा समावेश करण्यात आलेला आहे.
bullet प्रत्येक अभ्यास पत्रिका १०० गुणांची असेल. अभ्यास पत्रिकांची उत्तरे दिलेल्या मुदतीत (२५ दिवसात) घरीच लिहून प्रतिष्ठानकडे पोस्टाने किंवा प्रत्यक्ष कार्यालयात येऊन द्यावयाची आहेत.
bullet प्रत्येक अभ्यास पत्रिकेत एक प्रश्न अनिवार्य असून इतर प्रश्नांना पर्याय असतील. अभ्यास पत्रिका १ ते ४ मधे प्रत्येक साहित्यप्रकारातील किमान एका ग्रंथाचा सखोल अभ्यास अपेक्षित आहे.
bullet परीक्षेचा अर्ज हा कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या संकेत स्थळावर (www.kusumagraj.org) उपलब्ध आहे. परीक्षेचा अर्ज बिनचूक भरून कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या पत्यावर पाठवायचा आहे. पत्ता बदलल्यास कळविण्याची जबाबदारी आपली आहे, न कळविल्यास अभ्यासपत्रिका व इतर साहित्य आपल्याला उपलब्ध न झाल्यास त्यास आपण स्वत:च जबाबदार असाल, कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाही.
bullet बिनचूक भरलेल्या परीक्षा अर्जासोबत रू ५००/- प्रत्यक्ष रोख किंवा डी.डी. 'कुसूमाग्रज प्रतिष्ठान' या नावाने दिलेल्या पत्यावर पाठवावा. धनादेश चालणार नाही. डी. डी. राष्ट्रीयकृत बँकेचाच असावा. रोख पैसे भरल्यास त्वरीत कार्यालयाची पावती मिळेल व आवश्यक ते साहित्यही मिळेल. डी.डी. व अर्ज मिळाल्यावर सर्व साहित्य आपल्या पत्यावर पाठविले जाईल.
bullet एकदा पाठविलेला डी.डी. कोणत्याही सबबीवर परत केला जाणार नाही किंवा पुढच्या वर्षीसाठी राखून ठेवला जाणार नाही.
bullet परीक्षा मे २०२५ मधे होईल.
bullet परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान ५० टक्के गुण आवश्यक आहे व प्रत्येक पेपरमध्ये किमान ३५ टक्के गुण आवश्यक आहेत.
bullet या परीक्षेत फेरतपासणी किंवा पुनर्मूल्यांकन पध्दत नाही.
bullet उत्तरपत्रिकेतील हस्ताक्षर आपले असावे. पुस्तकातील उतारे तसेच्या तसे नसावेत.
bullet पूर्वीच्या प्रश्नपत्रिका मिळणार नाही. कृपया तशी मागणीही करू नये.
bullet परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या प्रत्येकास 'साहित्यभूषण' प्रमाणपत्र प्राप्त होईल.
या परीक्षेतील पुरस्कार पुढीलप्रमाणे

new bullet ''साहित्यभूषण'' परीक्षेतील पुरस्कार पुढीलप्रमाणे
bullet प्रथम - 'इंद्रायणी' पुरस्कार - सन्मानपत्र व रोख रक्कम
bullet द्वितीय - 'गोदामाता' पुरस्कार - सन्मानपत्र व रोख रक्कम
bullet तृतीय - 'कृष्णामाई' पुरस्कार - सन्मानपत्र व रोख रक्कम
पुरस्कारप्राप्त व्यक्तीस कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या नियमानुसार प्रवासभत्ता देण्यात येईल.


Copyright 2010, Kusumagraj Pratishthan, Nashik. All Rights Reserved.
Site Designed & Maintained By Cyberedge Web Solutions Pvt. Ltd.