कुसुमाग्रज साहित्य व त्यांना मिळालेले पुरस्कार याची लांबच लांब यादी देणं शक्य नाही. पण काही पुरस्कारांचा इथे उल्लेख करावाच लागेल, ज्यामुळे वाङमयातील त्यांचे उत्तुंगत्व वाचकांना कळेल.
१९७४ साली 'नटसम्राट' नाटकाला 'साहित्यसंघ' पुरस्कार मिळाला. |
|
१९८५ साली अखिल भारतीय परिषदेचा 'राम गणेश गडकरी' पुरस्कार मिळाला. |
१९८६ मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना 'डि.लिट्' ही सन्माननीय पदवी प्रदान केली. |
१९८८ मध्ये संगीत नाटयलेखन पुरस्कार मिळाला. |
'ज्ञानपीठ' पुरस्कार हे त्यातले अत्युच्च शिखर होय. यापूर्वी त्यांचे निकटचे मित्र ख्यातनाम साहित्यिक वि.स. खांडेकर यांना हा पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार मिळविणारे ते पहिले मराठी साहित्यिक व दुसरे कुसुमाग्रज. |
|