जीवनपट




वर्ष वाटचाल

२७ फेब्रुवारी १९१२

पुणे येथे जन्म
नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर
दत्तक विधान व नामांतर - विष्णु वामन शिरवाडकर
१९१९ - २४
प्राथमिक शिक्षण - पिंपळगांव बसवंत
१९२४- २९
माध्यमिक शिक्षण - नाशिक येथील न्यू इंग्लिश स्कूल
(आत्ताची जु. स. रुंगठा हायस्कूल, नाशिक)
१९२९
बालबोधमेवा (संपादक - दे. ना. टिळक) मध्ये लेखन व कविता
मॅट्रिक्युलेशन उत्तीर्ण मुंबई विद्यापीठ
१९३०
हं. प्रा. ठा महाविद्यालयात प्रवेश व 'रत्नाकर' मासिकात कवितांना प्रसिध्दी
१९३२
काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात सहभाग
१९३३ धृव मंडळाची स्थापना, 'नवा मनू' मध्ये वृत्तपत्रीय लेखन,
'जीवन लहरी' या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
१९३४
बी. ए. परीक्षा उत्तीर्ण (मराठी - इंग्रजी)
१९३६-१९३८ गोदावरी सिनेटोनमध्ये प्रवेश,
'सती सुलोचना' कथालेखन व लक्ष्मणाची भूमिका
१९३८- १९४६ वृत्तपत्र व्यवसाय, साप्ताहिक प्रभा, दैनिक प्रभात, सारथी, धनुर्धारी, नवयुग इत्यादी.
विशाखा काव्यसंग्रह प्रकाशित (१९४२)
१९४४ विवाह. पत्नीचे नाव मनोरमा ( माहेरचे नाव गंगुबाई सोनवणी )
१९४६ 'वैष्णव' पहिली कांदबरी. 'दूरचे दिवे' पहिले नाटक
१९४६-१९४८ साप्ताहिक 'स्वदेश' संपादन
१९५० लोकहितवादी मंडळ स्थापना, संस्थापक सदस्य, शालेय पुस्तकांचे संपादन
१९५६ अध्यक्षपद मुंबई उपनगर साहित्य (मालाड)
१९५९ संयुक्त्त महाराष्ट्राच्या चळवळीत सत्याग्रह
१९६० मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे ६२ व्या वार्षिक उत्सवाचे अध्यक्षपद
१९६० राज्य पुरस्कार 'मराठी माती' (काव्यसंग्रह)
१९६२ राज्य पुरस्कार 'स्वगत' (काव्यसंग्रह)
१९६४ राज्य पुरस्कार 'हिमरेषा' (काव्यसंग्रह)
१९६४ अध्यक्षपद, ४५ वे मडगाव (गोवा) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अधिवेशन
१९६४ 'जीवनगंगा' नाशिक नगर पालिका शतसांवत्सरिक ग्रंथाचे संपादन
१९६६ राज्य पुरस्कार 'ययाति आणि देवयानी' या नाटकास
१९६७ राज्य पुरस्कार 'वीज म्हणाली धरतीला' नाटकास
१९६४-१९६७ पुणे विद्यापीठ विधी मंडळावर सदस्य
१९७० अध्यक्षपद, मराठी नाटय संमेलन, कोल्हापूर
१९७१ राज्य पुरस्कार 'नटससम्राट' नाटकास
१९६२-१९७२ अध्यक्ष, सार्वजनिक वाचनालय, नाशिक
१९७२ सौ. मनोरमाबाईंचे निधन
१९७४ 'नटसम्राट' नाटकास साहित्य अकादमी पुरस्कार (ताम्रपट व पाच हजार रूपये)
१९८५ अखिल भारतीय नाटयपरिषदेचा राम-गणेश गडकरी पुरस्कार
१९८६ डि. लिट् पुणे विद्यापीठ
१९८७ अमृत महोत्सव
१९८८ संगीत नाटयलेखन अकादमी पुरस्कार
१९८८ ज्ञानपीठ पुरस्कार
१९८९ अध्यक्ष, जागतिक मराठी परिषद, मुंबई
१९९१ पद्मभूषण
१९९६ कुसुमाग्रज तारा
१० मार्च १९९९ कुसुमाग्रजांचे निधन
२००३ पोष्टाचे तिकीट प्रकाशन

Copyright 2010, Kusumagraj Pratishthan, Nashik. All Rights Reserved.
Site Designed & Maintained By Cyberedge Web Solutions Pvt. Ltd.