कुसुमाग्रजांचे स्मारक उभारले जाऊन त्याद्वारे प्रतिष्ठानच्या कार्याची व्याप्ती वाढावी यासाठी महाराष्ट्र शासन आणि नाशिक महानगर पालिका ह्यांनी ९००० चौ.मी. जागा उपलब्ध करून दिली असून तेथे अंदाजे ३.५० कोटी रू. चे भव्य स्मारक उभारले गेले आहे. त्यातील २५०० चौ.मी. चे बांधकाम झाले असून ६००० चौ.मी. जागेत उद्यान होत आहे. |