१. |
ही अभ्यासवृत्ती मराठी भाषा व मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी वर्षातून एकदा देण्यात येईल. |
२. |
या अभ्यासवृत्तीसाठी कोणतीही वयोमर्यादा नसली तरी अभ्यासवृत्तीचा कालावधी १ जुलै ते ३० जून असा एक वर्षाचा राहील. |
३. |
या अभ्यासवृत्तीसाठी विशिष्ठ पात्रता अपेक्षित नसली तरी याबाबतचे अंतिम निर्णय प्रतिष्ठानने नियुक्त केलेली कार्यकारी समिती घेईल. |
४. |
अभ्यासवृत्तीचे व्यवस्थापन दोन स्तरांवरील समित्यांद्वारे पाहिले जाईल.
१) पाच सदस्यीय उच्चस्तरीय समितीमध्ये प्रकल्प छाननी-निवड करण्यासाठी निवड समितीचे तीन तज्ञ असतील आणि त्यांच्या सहाय्यार्थ प्रतिष्ठानतर्फे दोन [ कार्यवाह व अभ्यासवृत्ती समितीचे अध्यक्ष] सदस्य असतील.
२) प्रकल्प निवडीनंतरच्या कामकाजासाठी त्रिसदस्यीय कार्यकारी समितीमध्ये प्रतिष्ठानतर्फे दोन [कार्यवाह व अभ्यासवृत्ती समितीचे अध्यक्ष] सदस्य व मार्गदर्शनार्थ निवड समितीतील एक सदस्य असेल.
|
५. |
इच्छुक अभ्यासकांनी आपले स्वहस्ताक्षरातील अर्ज कार्यवाह, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, गंगापूर रोड, नाशिक-४२२०१३ या पत्यावर पाठवावेत. अर्जासोबत अर्ज छाननी शुल्क रुपये १००/- रोख किंवा मनिऑर्डरने पाठवावेत. |
६. |
अर्जाबरोबर दोन प्रतिष्ठीत व्यक्तींची शिफारस पत्रे जोडणे आवश्यक आहे. |
७. |
अर्जात अभ्यासाचा विषय, उद्दिष्टे,व्याप्ती आणि मर्यादा, अभ्यासाचा कच्चा आराखडा, अपेक्षित फलनिष्पत्ती, मराठी भाषा व मराठी साहित्य यांच्या संवर्धनाच्या दृष्टिकोनातून आपल्या अभ्यासाचे महत्व इत्यादी तपशील द्यावेत. |
८. |
सुयोग्य अभ्यासकाची निवड लिखित अर्जाच्या छाननीतून करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. आवश्यकता भासल्यास निवडक उमेदवारांना मुलाखतीसाठी व सादरीकरणासाठी नाशिकला बोलावण्यात येईल. यासाठीचा प्रवास व निवास खर्च अभ्यासकाला करावा लागेल. |
९. |
अभ्यासवृत्तीसाठी निवड झालेल्या अभ्यासकाला प्रतिष्ठानकडून मिळणार्या आर्थिक सहाय्याचासुयोग्य विनियोग करणार असल्याचा करारनामा करून द्यावा लागेल. |
१०. |
अभ्यासवृत्तीची रक्कम तीन टप्यात देण्यात येईल |
|
अ- अभ्यासकाचा प्रस्ताव अधिकृतपणे स्वीकारण्यात आल्यावर ३० टक्के
ब- सहा महिन्यानंतरच्या अभ्यासकाच्या अहवालावर कार्यकारी समितीने शिक्कामोर्तब केल्यावर ३० टक्के.
क- लेखन प्रकल्प पूर्ण केला आहे असा अहवाल कार्यकारी समितीने दिल्यावर ४० टक्के |
११. |
ही अभ्यासवृत्ती लेखनासाठी कराव्या लागणार्या अभ्यासासाठी संबंधित ग्रंथ्, संदर्भ ग्रंथ खरेदी करण्यासाठी प्रवासासाठी तसेच टायपिंग/बाईडिंग इत्यादीसाठी लागणार्या एकूण खर्चासाठी आहे. इच्छुक उमेदवारांनी आपल्या अर्जाबरोबर अंदाजपत्रकही सादर करणे अपेक्षित आहे. |
१२. |
प्रतिष्ठानने नियुक्त केलेल्या कार्यकारी समितीच्या मार्गदर्शनानुसार काम करणे अपेक्षित आहे. |
१३. |
अभ्यासवृत्ती प्राप्त अभ्यासकाने सप्टेंबर, डिसेंबर आणि मार्च या महिन्या अखेर आपल्या कामाचे तिमाही अहवाल कायकारी समितीस सादर करणे बंधनकारक असेल. लेखनाच्या अंतिम मसुद्याची प्रत ३० जूनच्या आत सादर करणे अपेक्षित आहे. |
१४. |
अभ्यासाअखेर सादर करण्यात आलेले लेखन प्रकाशित व वितरीत करण्याची जबाबदारी प्रतिष्ठानची नसेल. परंतु यासाठी आवश्यक ती शिफारस प्रतिष्ठान करू शकेल. |
१५. |
अभ्यासाअखेर लेखन प्रकाशित झाले तर त्यात कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अभ्यासवृत्तीचा स्पष्ट उल्लेख करावा लागेल. प्रकाशनाचे स्वामीत्व हक्क प्रतिष्ठान व अभ्यासक अशा दोघांचेही समसमान असतील. |
|
कार्यवाह
कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक. |